महाबळेश्वर

महाबळेश्वर

सविस्तर

पश्चिम घाटात वसलेले, निसर्गाचे वरदान लाभलेले महाबळेश्वर हे गिरिस्थान महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथील भव्य डोंगर रांगा, धबधबे व गर्द हिरवाई, आणि एकूणच निसर्ग तुम्हाला मोहवेल. पुणे- मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरांमधून अनेक चाकरमानी आणि व्यावसायिक या ठिकाणी क्षणभर शांतीसाठी शनिवार रविवार जोडून छोट्या सहलींना येत असतात. हिरवीगर्द झाडी, दऱ्या, कोसळणारे धबधबे हे या कंटाळलेल्या जीवांना प्रफुल्लित करून पुन्हा कामावर रुजू होण्याचं बळ देतात. 

महाबळेश्वर पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर आणि मुंबईपासून 255 किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये इथे पर्यटकांची गर्दी दिसून येते. इथला सुंदर सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा रोमांचक अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. स्ट्रॉबेरीच्या शेताची भटकंती केल्यावर स्ट्रॉबेरी क्रीमचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत महाबळेश्वर मध्ये असताना खाली दिलेले अनुभवही नक्की घ्या 

  • वेण्णा लेक येथे नौकाविहार
  • ट्रेकिंग
  • महाबळेश्वर मंदिर दर्शन
  • स्ट्रॉबेरी क्रीमचा आस्वाद

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे