बुकिंग आणि रद्द करण्याबाबत धोरण


  • 12 वर्षांखालील दोन मुले जर त्यांच्या पालकांसोबतच बेड वापरत असतील तर त्यांच्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही.
  • शुल्क आवश्यकतेनुसार पुनरावृत्तीच्या अधीन आहे.
  • पाळीव प्राण्यांना परवानगी नाही.
  • वातानुकूलनाची यंत्रणा निकामी असल्यास, त्या खोलीचे दर नॉन-एसी प्रमाणे मोजले जातील. अशा परिस्थितीत, एसीचा बिघाड झाल्यास अतिथींनी भरलेल्या रक्कमेतील 500/- रुपये परत केले जातील, पूर्ण परतावा दिला जाणार नाही. 
  • टीव्ही सह इंटरकॉम आणि केबल कनेक्शन अतिथींना अतिरिक्त सुविधा म्हणून पुरवले जातात, यातील कोणतीही सुविधा परिस्थितीनुसार उपलब्ध नसल्यास परतावा दिला जाणार नाही.
  • खोलीचा ताबा घेण्यापूर्वी पूर्व बुकिंग किंवा तात्काळ बुकिंग केलेल्या अतिथींनी जितके दिवस निवास करायचा त्या सर्व दिवसांचे शुल्क, अतिथी शुल्क आणि लक्झरी कर भरावे. तसेच स्वागत कक्षातील नोंदणी पुस्तिकेत सर्व आवश्यक नोंदी (त्यांच्या स्वत: च्या हस्ताक्षरात) कराव्यात.
  • रिसॉर्ट/हॉटेलचे आरक्षण ऑनलाईन केलेल्या अतिथींनी बुकिंगची पावती/ईमेल कॉपी किंवा एसएमएस आणि फोटो ओळखपत्राची प्रत सोबत बाळगावी. चेक-इन करताना रिसॉर्ट व्यवस्थापक किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना हा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.
  • खोलीचा ताबा घेताना अतिथींना प्रति खोली 200/- ठेव जमा करावी लागेल. चेक आउट करताना संपूर्ण पेमेंट झाल्यावर तसेच नोंदणी पुस्तिकेत तशी नोंद केल्यावर ही ठेव आपणास परत केली जाईल. 



रद्द करण्याबाबतचे धोरण 


  • जर तुम्ही निवासाच्या तारखेपूर्वी 0-3 दिवसांच्या आत आरक्षण रद्द केले तर तुम्हाला तुमच्या बुकिंग रक्कम मधून 100% रद्दीकरण शुल्क म्हणून आकारले जाईल, व कोणतीही रक्कम परत दिली जाणार नाही. 
  • जर तुम्ही निवासाच्या तारखेपूर्वी 4-7 दिवसांच्या आत आरक्षण रद्द केले तर तुम्हाला तुमच्या बुकिंग रक्कमेतून 25% रद्दीकरण शुल्क म्हणून आकारले जाईल.
  • जर तुम्ही निवासाच्या तारखेपूर्वी 8 दिवसांपूर्वी आरक्षण रद्द केले तर तुम्हाला तुमच्या बुकिंग रक्कम मधून 10% रद्दीकरण शुल्क म्हणून आकारले जाईल.
  • क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे बुक केलेले बुकिंग रद्द करायचे झाल्यास, परतावा फक्त क्रेडिट/डेबिट कार्ड धारकांच्या बँकेच्या नावाने केला जाईल.
  • रोख/डीडी द्वारे केलेले बुकिंग रद्द करायचे झाल्यास किंवा पेमेंटची इतर कोणतीही पद्धत असल्यास, परतावा फक्त क्रॉस चेक/RTGS/NEFT द्वारे केला जाईल.
  • एमटीडीसीच्या ट्रॅव्हल एजंट्स (प्रवास/बुकिंग संबंधित कामाचे प्रतिनिधी) द्वारे केलेले बुकिंग रद्द करायचे झाल्यास, रद्द करणे/परतावा देणे हे फक्त संबंधित प्रतिनिधींद्वारे केले जाईल.
  • सर्व रिसॉर्ट्सना उपाहारगृह संलग्न आहेत, म्हणून रूम, ग्रुप अकोमोडेशन किंवा रिसॉर्ट परिसरात स्वयंपाकाला परवानगी नाही.
  • भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास, एमटीडीसीतर्फे काही रिसॉर्ट्समध्ये जनरेटर यंत्रणा वापरली जाईल. तथापि, ही सुविधा 24 तास सुरु नसेल. अशा परिस्थितीत वातानुकूलन यंत्रणा, गिझर इत्यादींच्या कार्यासाठी वीज पुरवठा होणार नाही. मात्र या कारणाने कोणताही परतावा लागू होणार नाही. 
  • सरकारी नियमानुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) स्वरूपात अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
  • एकूण देयकावर (बिलावर) प्रतिदिन नियमानुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) स्वरूपात अतिरिक्त शुल्क आकारले जाईल ज्यात खोलीचे शुल्क आणि अतिरिक्त अतिथींचे शुल्क समाविष्ट आहे.
  • खोलीचे शुल्क रु. 0.00 ते रु. 999.00 प्रति खोली प्रति दिन - 0% (व्यवहार मूल्यावर)
  • खोलीचे शुल्क रु. 1000.00 ते रु. 2499.00 प्रति खोली प्रति दिन - 12% (व्यवहार मूल्यावर)
  • खोलीचे शुल्क रु. 2500.00 ते रु. 7499.00 प्रति खोली प्रति दिन - 18% (व्यवहार मूल्यावर)
  • खोलीचे शुल्क रु. प्रति खोली 7500.00 आणि त्याहून अधिक - 28% (व्यवहार मूल्यावर)
  • उपाहारगृहासाठी: वातानुकूलित आणि विना वातानुकूलित उपहारगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांवर 5% वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जाईल. मद्य पेयांवर मूल्यवर्धित कर लागू आहे.
  • अपवादात्मक परिस्थितीत, एमटीडीसीतर्फे पर्यटक/प्रतिनिधी किंवा ऑनलाईन केलेले बुकिंग रद्द केले जाऊ शकते. तथापि, अशा परिस्थितीत अतिथींना एमटीडीसीतर्फे पूर्ण परताव्याची रक्कम दिली जाईल.
  • बुकिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या सूचना आणि तक्रारींसाठी, कृपया आमच्याशी reservation@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधा. 
  • बुकिंग अयशस्वी झाल्यास व तुम्हाला पुष्टीकरण प्राप्त न झाल्यास, व्यवहाराच्या तारखेपासून 7-10 दिवसात तुमच्या संबंधित खात्यावर पैसे परत केले जातील.
  • आम्ही किमंतीवर बृहन्महाराष्ट्र मंडळाला 25%, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी सहल, माजी सैनिक, अपंग व्यक्ती, वार्षिक करार यांना 20%,आणि अनिवासी भारतीय, महाराष्ट्र सरकारी कर्मचारी यांना 10% अशी सवलत देतो. काही निवडक रिसॉर्ट्समध्ये, हीच सवलत विना हंगामी कालावधीत 20% तर गर्दीच्या हंगामात 10% इतकी बदलली जाऊ शकते. मोठ्या संख्येत बुकिंग (Bulk Booking Discount) केल्याचे डिस्काउंट वगळता एकापेक्षा अधिक रूमवर वरील सवलत लागू होणार नाही.


सवलतींबाबत अधिक माहितीसाठी


एमटीडीसी टोल फ्री क्रमांक: 1800-229930 (सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00)

दूरध्वनी क्रमांक: कार्यालय: (022) 22845678 - एमटीडीसी आरक्षण केंद्र, मुंबई

ईमेल: reservation@maharashtratourism.gov.in

संकेतस्थळ: https://www.maharashtratourism.gov.in/