उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य

खाकसी

सविस्तर

नागपूर पासून 50 किमी अंतरावर उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य आहे. उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि उमरेड करंडला प्रकल्पांना जोडते. या पक्षांच्या नंदनवनात पक्ष्यांच्या तब्बल 180 प्रजाती आढळून येतात, यातील 10 स्थलांतरित तर 7 अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहेत. येथे आढळणार्‍या काही पक्ष्यांमध्ये लांब शेपटीचा पोपट, शिक्रा, रानकोंबडे आणि पावशे यांचा समावेश होतो. इथे सस्तन व सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

मार्च आणि जून दरम्यान येथे अत्यंत मोहक वातावरण असते. याठिकाणी सहलीचा विचार करत असाल तर वैनगंगा नदी आणि अभयारण्याला लागूनच असलेल्या मोठ्या गोसे खुर्द धरणाला भेट देण्याची संधी सोडू नका. शहरातील गोंगाटापासून दूर एका निर्जन, निवांत सुट्टीसाठी हे ठिकाण एक उत्तम निवड आहे.


ऑक्टोबर - जून


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - जून

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य भेटीत खालील अनुभव नक्की घ्या

  • जंगल सफारी
  • पक्षी निरीक्षण
  • निसर्गात भ्रमंती

उमरेड करंडला अभयारण्यात आढळणारे वन्यजीव