कर्नाळा पक्षी अभयारण्य

रायगड जिल्हा

सविस्तर

पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्य पनवेलपासून 200 कि.मी. अंतरावर स्थित आहे. 200 पेक्षा अधिक सुंदर प्रजातींचे पक्षी याठिकाणी आढळतात. या अभयारण्यामध्ये अनेक नैसर्गिक पाऊलवाटा म्हणजेच ट्रेल्स आहेत तसेच हे छोटा सूर्यपक्षी, मातकट पायाची फटाकडी, बुलबुल, मलबारी चंडोल, निलगिरी रानपारावा आणि इतर दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांसाठी घर आहे. 

जर तुम्हाला काही रोमांचक अनुभव घ्यायचे असतील, तर बाराव्या शतकातील कर्नाळा किल्ल्याची चढाई (ट्रेकिंग) करा आणि शिखरावरून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचा शांत व नयनरम्य देखावा अनुभवा. तुमच्यासाठी जंगलातील रंगीबेरंगी फुलपाखरे बघण्याचा हा खूप सुंदर अनुभव ठरू शकतो. अभयारण्याची संपूर्ण हिरवेगार सौंदर्य अनुभवायचे असेल, तर पावसाळ्यात नक्की भेट द्या. 


जून - डिसेंबर


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

जून - डिसेंबर

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी कर्नाळा अभयारण्य भेटीत हे उपक्रम आवर्जून करा 

  • ट्रेकिंग
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • पक्षी निरीक्षण

कर्नाळा अभयारण्यात आढळणारे प्राणी