भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

पुणे

माहिती

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरू (इंडियन जायंट स्क्विरल) चे घर आहे. पुणे शहरापासून हे १३८ किलोमीटर दूर असलेले एक मोठे आणि जैवविविधतेने भरलेले ठिकाण आहे. या अभयारण्याला IBA (Important Bird Area) चा दर्जा मिळालेला आहे. इथे अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पती (झाडे-झुडपे) पाहायला मिळतात, ज्यामुळे आज जगातल्या १२ महत्त्वाच्या जैवविविधता ठिकाणांपैकी (biodiversity hotspots) हे एक आहे! जर तुम्हाला ऍडव्हेंचर आवडत असेल, तर इथे ट्रेकिंगसाठी छान रस्ते आहेत. त्यामुळे तुम्ही हे निसर्गाचे अद्भुत रूप शांतपणे फिरून बघू शकता. आणि जर तुम्ही वाइल्डलाइफ फोटोग्राफर असाल, तर आपल्या कॅमेऱ्यात पट्टेदार तरस (Striped Hyenas), कोल्हा (Golden Jackals) आणि भेकर (Barking Deers) यांना कैद करायला तयार राहा. या अभयारण्यात भीमाशंकर मंदिर देखील आहे, जे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी (बारा स्वयं-प्रकट झालेल्या शिवालयांपैकी) एक आहे. पावसाळा या निसर्गसंपन्न ठिकाणी सौंदर्य अनुभवण्याचा उत्तम काळ आहे.


ऑक्टोबर - मार्च


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - मार्च

विना गर्दीचा हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी भीमाशंकर भेटीत हे उपक्रम आवर्जून करा

  • फायरफ्लाय साइटिंग (काजवे दर्शन)
  • सफारी
  • ट्रेकिंग
  • नौकाविहार
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • पक्षी निरीक्षण

या भागात आढळणारे वन्यजीव