April 28, 2025 - MTDC

MTDC Oath Ceremony

मी, गांभीर्यपुर्वक शपथ घेतो की

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पध्दतीने विहीत कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपुर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबध्द राहीन.

मी, सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन.

मी, उक्त कायद्याने नागरिकांना प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून व नागरिकांविषयी सेवा भाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करेन.

Location

Mumbai, Maharashtra